SSC-HSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षांसंदर्भात एक महत्वाची अपडेट्स!
![An important update regarding 10th 12th exams](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/SSC-HSC-Exam-780x470.jpg)
SSC-HSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षांसंदर्भात एक महत्वाची अपडेट्स समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांकरिता बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांवर बहिष्काराचा इशारा दिला आहे.
शालेय शिक्षण विभागाने आपल्या प्रलंबित मागण्यांकरिता मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र व ईमेल पाठवले आहेत. मात्र अजूनही सर्व मागण्या प्रलंबित असून कोणताही ठोस निर्णय राज्य सरकारकडून होत नसल्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षावर बहिष्कार टाकण्याचे पाऊल महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळकडून उचलण्यात आले आहे.
हेही वाचा – Ola Uber Rent Hike : पुण्यात ओला आणि उबरचा प्रवास महागला, पाहा नवे दर!
शिक्षण संस्थाचालकांच्या मागण्या काय आहेत?
१. राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. २०१२ पासून अजूनपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया झालेली नाही.ती ताबडतोब करण्यात यावी.
२. महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शाळांचे वेतनेत्तर अनुदान थकीत द्यावे.
३. प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक देण्यास विरोध.
४. नवीन शैक्षणिक धोरण आणताना आर्थिक तरतुदी बाबत माहिती द्यावी.