नागपूरची हाफ चड्डी घातल्यावर स्पर्धा परीक्षा द्यावी लागत नाही : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Nana-Patole-700x470.png)
बुलढाणा । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) पुन्हा एकदा बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. नागपूरचा गणवेश घातला की स्पर्धा परीक्षा देण्याची गरज भासत नाही. संघाचा गणवेश घातल्यानंतर तो व्यक्ती थेट जॉईंट सेक्रेटरी होतो, असे वक्तव्य नाना पटोले (Nana Patole) यांनी एका कार्यक्रमात केले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता, हे मात्र कळू शकलेले नाही. ते बुलढाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलत होते. ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दरम्यान सर्वोत्कृष्ट डील, HP, Lenovo, MSI, Asus आणि इतर बर्याच ब्रँड्सकडून सर्वाधिक विक्री होणारे लॅपटॉप मिळवा.
यावेळी नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. सध्या देशाची व्यवस्था संपवण्याचं काम सुरु आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ संपवण्याचे काम सुरु आहे. सुप्रीम कोर्टाचे जजेस माध्यमांच्या समोर येतात आणि म्हणतात, आम्हाला वाचवा…! सुप्रीम कोर्टाचे जजेस आम्हाला वाचवा म्हणतात तर न्याय व्यवस्था ही धोक्यात आल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.
नाना पटोले यांच्या या टीकेला भाजप आमदार राम कदम यांनी तात्काळ प्रत्युत्तरही दिले. हाफ पॅन्टचे एवढंच कोड कौतुक असेल तर नाना पटोले यांनी एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जावे. तेथे गेल्यानंतर नाना पटोले यांना देशप्रेम काय असते, हे कळेल. देशप्रेम काय आहे, समर्पित भाव काय आहे, देशासाठी कसं झिजायचं असते, हे नाना पटोलेंना कळेल. असे राम कदम यांनी म्हटले. ज्या दिवशी संघाच्या शाखेत जाल त्या दिवशी तुम्हीच सांगाल की, आत्तापर्यंत मी चुकीच्या वाटेवर होतो, असेही राम कदम म्हणाले.
नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कलेक्टर व्हायचं असेल, एसपी व्हायचं असेल, डीएफओ व्हायचं असेल, फॉरेन सर्व्हिसमध्ये जायचं असेल तर तुम्हाला युपीएससीच्या (UPSC) परीक्षा आधी पास करायच्या होत्या. आत्ता त्या युपीएससीच्या परीक्षा नाहीत. तर आत्ता नागपूरची चड्डी ज्यांनी घातली तो डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरी होतो अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.