अॅड. प्रकाश आंबेडकरांची फडणवीसांवर शेलक्या भाषेत टीका ; ‘ती’ क्लिप जनतेसमोर जाहीर करायला हवी होती
![अॅड. प्रकाश आंबेडकरांची फडणवीसांवर शेलक्या भाषेत टीका ; ‘ती’ क्लिप जनतेसमोर जाहीर करायला हवी होती](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/05_04_2019-prakash_ambedkar-fir_19104716-1.jpg)
अकोला |
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विधान सभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे. फडणवीसांनी विधिमंडळात सादर केलेली ‘ती’ क्लिप जनतेसमोर जाहीर करायला हवी होती, असे ते म्हणाले. अॅड. प्रकाश आंबेडकर आज अकोल्यात बोलत होते. ते म्हणाले, ‘मी फडणवीसांना मैदानी खेळाडू व दिलेर समजत होतो.
पण त्यांचा दिलेरपणा आणि खेळाडूवृत्ती दिसली नाही. ‘ती’ क्लिप त्यांनी सभापतींना सभागृहात दिली. याला सामान्य माणसाच्या भाषेत खालच्या दर्जा (अश्लील भाषेत)चे राजकारण म्हणतात.’ राजकारण करायचे असेल तर देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ क्लिप लोकांपुढे जाहीर करायला हवी होती. ही सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे. फडणवीसांनी लोकांपुढे ‘ती’ क्लिप आणली असती तर पोलिसांनी नोटीस देखील दिली नसती, असे अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खालच्या भाषेत देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.