Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

Accident News: तुळजाभवानी दर्शनाला गेलेली बस घाटात उलटली; मोशीतील महिला भाविकाचा मृत्यू!

मोशीतील भाविकांच्या बसवर काळाचा घाला : अनेक भाविक जखमी झाल्याची भिती

तुळजापूर (जि.धाराशिव) : पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड मोशी येथून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेली खाजगी बस बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शहरालगतच्या घाटात उलटली. या घटनेत एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून, ४५ भाविक जखमी झाले आहेत. यातील १८ जण गंभीर असल्याने त्यांना धाराशिवच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघातातील एका जखमीने दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील मोशी येथील ४६ भाविकांना घेऊन एक खाजगी ट्रॅव्हल्स बुधवारी सकाळी ६ वाजता तुळजापूरकडे रवाना झाली. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तुळजापुरात दाखल झाल्यानंतर या भाविकांची सोय केलेल्या लोहिया मंगल कार्यालयात सर्वांनी जेवण घेतले. यानंतर देवीचे दर्शन करुन सर्व भाविक त्याच बसने मोशीकडे जाण्यासाठी सायंकाळी ६ वाजता परतीच्या प्रवासाला लागले.

मात्र, शहराला लागूनच असलेल्या घाटातील एका वळणावर ही बस रस्त्यावरच उलटली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तसेच शहरातील नागरिकांनी याठिकाणी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. या घटनेत मोशी येथील रेखा गणपत ओव्हाळ या महिला भाविकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर ४५ भाविक जखमी झाले आहेत. बसमधील सर्व भाविक मोशी व डूडुळगाव येथील रहिवासी आहेत.

या जखमींना धाराशिवला हलवले…

शांताबाई बाबू बोराटे, चंदा शिंदे, विजया दीपक साबळे, सुजित बोके, विहान शिंदे, भावना नाखाले, उषा सुग्रीव शिंदे, लक्ष्मी धोत्रे, राणी फडतरे, आशा रामकरे, सारिका कुटे, बसचालक ज्ञानेश्वर बारस्कर, मारुती दसने, राधाबाई पतंगलाड, मंदाकिनी म्हेत्रे, स्वरीत अल्लाट, रुपाली गायकवाड, सुशिला बोराटे, कल्पना भारत शेळके, सुनिता अशोक भोर यांना गंभीर मार लागल्याने त्यांना तुळजापुरात प्रथमोपचार करुन धाराशिव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर तुळजापुरातच उपचार सुरु आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button