ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

अपघातानंतर कुर्ला बेस्ट बस स्थानक आज बंद

कुर्ल्यातील जीवघेण्या अपघातामागचं कारण काय ?

कुर्ला : मुंबईतील कुर्ला येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण आणइ तेवढ्याच दुर्दैवी अपघाताचे हादरे आज सकाळीही बसत आहेत. अत्यंत वेगाने आलेल्या बेस्टच्या इलेक्ट्रॉनिक बसने गर्दीत घुसून अनेकांना चिरडलं. तसेच रस्त्यावरील अनेक वाहनांनाही जोरदार धडक देत त्यांचा चेंदामेंदा केला. या बसने अनघ्या 100 मीटरच्या अंतरात 40 हून अधिक वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातातामध्ये आत्तापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक नागरिक जखमी झालेत.. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जखमी नागरिकांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मात्र हा भीषण अपघात कशामुळे झाला हाच प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे. ज्या बसचा अपघात झाला त्याचा ड्रायव्हर मद्यधुंद होता की बसचे ब्रेक फेल झाले होते ? त्याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांच्या मते ड्रयव्हर हा मद्यधुंद होता. तर झोन 5 चे डीसीपी गणेश गावडे यांच्या सांगण्यानुसार या अपघाताचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी बसचा ड्रायव्हर संजय मोरे ( वय 54) याला अटक केली असून त्याच्याविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बस मध्ये तब्बल ६० प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलिस आणि एमएसएफ जवानही जखमी झाले आहेत. यातील पीएसआय प्रशांत चव्हाण या जखमी अधिकाऱ्याच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई कुर्ला पोलीस करत आहेत.

आरडाओरडा नी एकच गदारोळ
सोमवारी रात्री 9.50 च्या सुमारास ही दुर्घटना कुर्ला पश्चिमेकडील अंजुम-ए-इस्लाम शाळेजवळील एसजी बारवे रोडवर झाली. भरधाव वेगाने येणारी अनियंत्रित बस गर्दीत घुसली आणि ते पाहून लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. 100 मीटरच्या इंतरावर बसने 30-40 गाड्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे फूटपाथवरील तसेच गाडीत बसलेले काही लोकही जखमी झाले. चहूबाजूने नुसता आरडाओरडा, गोंधळ सुरू होता. अनेकांना चिरडल्यानंतर अखेर ही इलेक्ट्रॉनिक बस एका इमारतीला धडकून थांबली. संपूर्ण परिसरात अफरातफर माजली होती, प्रत्येक जण जीव वाचवण्यासाठी इकडेतिकडे पळत होता. या अपघाता अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

अपघातानंतर कुर्ला बेस्ट बस स्थानक बंद
कुर्लातील कालच्या भीषण अपघातानंतर कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील बेस्ट बस स्थानक आज बंद आहे. कालच्या घटनेनंतर कुठलाही अनुश्चित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे.बेस्ट बस बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत असून त्यांना चालत किंवा रिक्षाने इच्छिकस्थळी पोहचावे लागत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button