Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या दोन तासाचा ब्लॉक
![A two-hour block tomorrow on the Mumbai-Pune Expressway](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Mumbai-Pune-Expressway-1-780x470.jpg)
पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी ३५/५०० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असून २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत या लांबीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.
हेही वाचा – ‘मोदी जेथे जातात तेथे पराभव अटळ..’; काँग्रेस नेत्याची खोचक टीका
#यशवंतरावचव्हाण द्रुतगती मार्गावर #पुणे वाहिनीवर कि.मी ३५/५०० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू असून २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ#Highway #TrafficManagement
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) November 20, 2023
या कालावधीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने द्रुतगती मार्गाच्या कि.मी ०८/२०० येथील शेडूंग फाटा येथून वळवून रा.म.मा. क्र. ४८ जुना मुंबई पुणे महामार्गावरील शिंग्रोबा घाटातून द्रुतगती मार्गाच्या मॅजिक पॉइंट कि.मी. ४२/१०० येथून पुन्हा द्रुतगती मार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येईल. तसेच गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी २ वाजता द्रुतगती मार्गावरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.