‘मोदी जेथे जातात तेथे पराभव अटळ..’; काँग्रेस नेत्याची खोचक टीका

मुंबई : एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका केली आहे. पंतप्रधान मोदी जेथे जातात तेथे पराभव अटळ आहे, असं नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले म्हणाले, नरेंद्र मोदी व भाजपा हे इव्हेंटबाजी करण्यात व श्रेय घेण्यात पटाईत आहेत. वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यालाही मोदी त्यांच्या नावाच्या स्टेडियममध्ये गेले. मात्र, वर्ल्डकपमधील सर्व सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा अंतिम सामन्यात पराभव झाला.
हेही वाचा – वायू प्रदूषणामुळे वाढतोय ‘या’ रोगाचा धोका; जाणून घ्या लक्षणे
भारतीय संघ जिंकला असता तर त्याचे श्रेय मात्र मोदी व भाजपाने घेतले असते हे जगजाहीर आहे. मोदी जेथे जातात तेथे पराभव होतो. त्यांना नशीब व प्रभू रामही साथ देत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.