breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे साकारली जाणार आयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती

Shrimant Dagdusheth ganpati Temple : श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे यंदाच्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यंदाच्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरूण मंडळाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकरण्यात येणार आहे.

Shrimant Dagadusheth ganpati Temple : कशी असेल यंदाच्या गणशोत्सवात दगडूशेठ गणपतीची सजावट?

आजपासून पुण्यात श्रीराम मंदिराच्या प्रतिकृती साकारण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. ७५ दिवसांत आयोध्येतील श्रीराम मंदिरांची प्रतिकृती साकारली जाणार आहे. भाविकांना श्रीं सोबतच आता आयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे देखील दर्शन होणार आहे. तसेच मंदिरासोबतच काल्पनिक रामसेतू देखील साकारला जाणार आहे.

हेही वाचा – ‘जी-२०’ प्रतिनिधींचा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभाग

Shrimant Dagadusheth ganpati Temple : कशी असेल यंदाच्या गणशोत्सवात दगडूशेठ गणपतीची सजावट?

मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरुन त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील बसविण्यात येणार आहेत. प्रतिकृतीमध्ये २४ खांब आणि २४ कमानी उभारण्यात येणार आहेत. मंदिराचा मुख्य घुमट १०० फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे १०८ फूट उंच मंदिर असेल. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव ११ कळस असणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button