breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

धक्कादायक! पत्नीची छेड काढणाऱ्या अल्पवयीन मुलाची पतीकडून हत्या

मुंबई : मुंबईत एक धक्कादाक घटना उघडकीस आली आहे. पत्नीवर वाईट नजर ठेवत अस्याच्या संशयावरून एका व्यक्तीने अस्पवयीन मुलाची निर्घृण हत्या केली. यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते घरातल्या किचनमध्ये ठेवले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नेमकं काय घटलं?

शफी अहमद अब्दुल माजिद शेख हा मुंबईतल्या चेंबूर येथील म्हाडा वसाहीत रिक्षाचालक पत्नीसह राहतो. या ठिकाणी राहणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन तरूणाची शफी अहमदने हत्या केली आहे. इश्वर ललित पूत्रान असं मुलाचं नाव आहे. इश्वर हा अनाथ होता. इश्वर लहान असताना ललित पुत्रन यांनी त्याला दत्तक घेतलं आहे. ललित पुत्रन यांना दोन मुली आहेत. एका मुलीचं लग्न आरोपी शफी अहमद माजिद शेख यांच्याशी झालं. पण लग्न झाल्यापासूनच आरोपी शफीला ईश्वरचा स्वाभाव आवडत नव्हता.

आपली पत्नी आणि तिच्या लहान बहिणीशी इश्वर लगट करत असल्याचा संशय त्याच्या मनात होता. तसंच इश्वर मानलेल्या बहिणींची वारंवार छेड काढत असल्याचा रागही त्याच्या डोक्यात होता. याबाबत आरोपी शफी अहमदने ललित पूत्रण यांना ही गोष्ट सांगितली. इश्वरचा आपल्या मानलेल्या बहिणींबरोबरचं वागणं ठिक वाटत नसल्याचं त्याने ललित पुत्रन यांना सांगितलं. पण ललित पुत्रण हा आपला मुलगा असून त्या त्याच्या बहिणी आहेत, बहिण भावामध्ये थट्टा-मस्करी होत असेल असं सांगत ललित पुत्रण यांनी हा विषय टाळला. पण आरोपी शफी अहमद याच्या डोक्यातून हा विषय जात नव्हता.

हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, ‘या’ दिवशी होणार पुढील सुनावणी

शफी अहमदने इश्वरला यासंदर्भात अनेकवेळा समजही दिली. पण यानंतरी इश्वरच्या स्वभावात बदल होत नसल्याने शफी अहमदचा पारा चढला होता. घटनेच्या दिवशी आरोपी शफीने इश्वरला घरी बोलावलं आणि पु्न्हा बहिणीशी असं न वागण्याची समज दिली. पण इश्वरने त्याला बोलणं उडवून लावलं. यावरुन दोघांमध्ये भांडण झालं. भांडणं टोकाला पोहोचलं, शफीने किचनमधला कोयता आणून इश्वरच्या मानेवर वार केला. हा वार इतका भीषण होता की इश्वरचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर शफीने कोयत्याने मृतदेहाचे हात, पाय आणि शीर धडावेगळं केलं. मृतदेहाचे चार तुकडे करुन ते त्याने प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले.

त्यानंतर घरातील रक्ताचे सर्व डाग स्वच्छ केले. मृतदेहाच्या तुकड्यांच्या पिशव्याने आरोपी शफीने घरातल्या किचनमध्ये लपवले. दुसरीकडे २४ तास उलटून गेल्यानंतरही इश्वर घरी न आल्याने ललित पुत्रण यांनी इश्वरची शोधाशोध सुरु केली. पण त्याचा कुठेच पत्ता लागत नव्हता. ललित पुत्रन यांना शफीवर संशय आला, याबाबत त्यांनी शफीकडे विचारणा केल्यावर आपण इश्वरची हत्या करुन तुकडे किचनमध्ये ठेवल्याची कबुली त्याने दिली.

ललित पूत्रन यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. चेंबूरमधल्या आरसीएप पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. तपासात इश्वरच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांना किचनमध्ये सापडले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button