मुंबईतील गोरेगावमध्ये इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू
![A fire broke out in a building in Goregaon, Mumbai, 7 people died](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Mumbai-Goregaon-Building-Fire-780x470.jpg)
मुंबई : मुंबईतील गोरेगावमध्ये एका इमारतीच्या पार्किंगला भीषण आग लागली. यात आतापर्यंत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर जवळपास ४० जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
गोरेगाव पश्चिममधील जय भवानी इमारतीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री तीन वाजता आग लागली. ही इमारत पाच मजली आहे. अग्निशामक दलाने तातडीने मदतकार्य सुरू करत जवळपास ३० जणांना सुखरुप वाचवलं आहे. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.
6 people lost their lives and 40 were injured in early morning fire in residential building in #Mumbai’s #Goregaon area. According to #BMC fire has been covered up by all side and cooling operation is underway. pic.twitter.com/HCvcNTNjty
— Mayuresh Ganapatye (@mayuganapatye) October 6, 2023
हेही वाचा – World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषकातील १० संघांचे शिलेदार कोण आहेत? वाचा सविस्तर..
Visuals of the residential building in Mumbai's Goregaon where a fire broke out earlier today, leaving seven people dead and several others injured. pic.twitter.com/x1SIhslAwg
— Press Trust of India (@PTI_News) October 6, 2023
आगीत तळमजल्यावरील काही दुकानं आणि गाड्या जळून खाक झाल्या आहेत. ही आग मध्यरात्री लागल्याने झोपेत आग लागल्याचं उशिरा लक्षात आल्याने अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.