TOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र
इंद्रायणी नदीत पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू
तळेगाव दाभाडे येथील तीन विद्यार्थी गेले होते पोहायला
![Indrayani, swimming in river, child drowned, Pimpri Chinchwad, Talegaon, Pune, Maharashtra,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Swimming-780x470.png)
पिंपरी: इंद्रायणी नदीत पोहायला गेलेल्या तीन विद्यार्थ्यांपैकी एका जणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी (दि. २५) दुपारच्या सुमारास घडली. आदित्य शरद राणे (वय २२) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य मुळचा मध्य प्रदेशमधील आहे. आदित्य आणि इतर मित्र तळेगाव दाभाडे येथील एका अभियांत्रिकी महाविद्यायात तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास सहा विद्यार्थी जाधववाडी येथे इंद्रायणी नदीवर पोहण्यासाठी गेले होते.
यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही बुडाले. बुडालेल्या तिघांना वाचवण्यासाठी त्यांचे मित्र गेले असता दोघांना वाचविण्यात यश आले. मात्र, एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.