Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

गौतम अदानींना मोठा धक्का ! टॉप १० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

मुकेश अंबानी १० व्या क्रमांकावर

मुंबई : अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात स्थित रिसर्च फर्म, हिंडनबर्गचा अहवाल अदानी समूहाला चांगलाच महागात पडत आहे. रिसर्च फर्मचा अहवाल प्रकाशित झाल्यापासून, अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांमध्ये खळबळ उडाली आणि फक्त दोन दिवसात समभागात मोठ्या प्रमाणात घसरन नोंदवण्यात आली आहे. शेअर्सच्या जोरदार घसरणीचा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या नेटवर्थवरही वाईट परिणाम झाला आहे. यापूर्वी फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनर्स इंडेक्समध्ये तीसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी आता अकराव्या क्रमांकावर पडले आहेत.

अदानींची मालमत्ता ३६.१ अब्ज डॉलरने कमी होऊन ८४.२१ अब्ज डॉलर झाली आहे. अदानी आता ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये कार्लोस स्लिमलाही मागे टाकून ११ व्या क्रामांकावर आले आहेत. अदानी यांच्या पाठोपाठ अंबानी १० व्या क्रामांकावर आहेत. अंबानींची संपत्ती ८२.२ डॉलर अब्ज इतकी आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालानुसार, अदानी ग्रुपने आपल्या कंपन्यांना ८५ टक्क्यांपेक्षा अधिक मूल्यावान दाखविण्यात आले आहे. तसेच, अदानी समूह मोठ्या कर्जामुळे दबावाखाली येऊ शकतो. अदानी समूहात सर्व काही ठीक नसल्याचा दावा करण्यात आला आहे. हा समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतलेला आहे, असं या अहवालात म्हटलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button