ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा महाराष्ट्रातील ‘या’ देवस्थानचा मोठा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/OXygen-Cylinder-e1620955606926.jpg)
नाशिक – महाराष्ट्रात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणाहून मदतीचा हात समोर येत आहे. त्यातच नाशिकच्या त्रंबकेश्वर देवस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. त्रंबकेश्वर देवस्थानने महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.
वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि ऑक्सिजन अभावी लोकांचा नाहक बळी जात असल्याचे लक्षात आल्यानंतर नाशिक येथील त्रंबकेश्वर देवस्थानने त्रंबकेश्वर येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार असल्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता काही प्रमाणात दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.
त्र्यंबकेश्वर येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारून त्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च देवस्थान कमिटीकडून करण्यात येणार असल्याचं विश्वस्त मंडळानी एकमताने ठरवलं आहे. यासंबंधी, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यांनी विश्वस्त मंडळाची बैठक बोलावून त्यांना असं आवाहन केलं होतं. त्यावर सर्व सदस्यांनी मंजुरी दिल्याने आता लवकरच हे काम पूर्णत्वास जाणार आहे.
शिवप्रसाद भक्त निवास परिसरात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असून हवेतून ऑक्सीजन निर्मिती करणारी यंत्रणा वापरून ऑक्सिजन निर्मिती करण्यात येणार आहे. देवस्थान ट्रस्टच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. दरम्यान, आतापर्यंतचा ऐतिहासिक निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतल्याचीही चर्चा सध्या आहे.