Pune : भोसरी परिसरातून १० लाख रूपये किमतीचा ३१ किलो गांजा जप्त
![31 kg ganja worth Rs 10 lakh seized from Bhosari area](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Pimpri-Chinchwad-ganja-780x470.jpg)
पुणे : भोसरी परिसरात गांजाचा साठा करणाऱ्याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून ३१ किलो गांजा जप्त केला. तर दुसऱ्या एका कारवाईत १० किलो गांजा ताब्यात घेण्यात आला. दोन्ही कारवाईमध्ये १० लाख ६४ हजार रुपयांचा ४१ किलो गांजा विरोधी पथकाने जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र काशीराम राठोड हा तालुका खेड वासुली फाटा या ठिकाणी गांजा विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याने हा गांजा विकास बादले या नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे समोर आले आहे. म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – आनंदाची बातमी! केरळात मान्सून दाखल, हवामान खात्याची माहिती..
दुसऱ्या एका कारवाईमध्ये भोसरी गावठाण या ठिकाणी आरोपी संजय मोहन शिंदे हा गेल्या काही महिन्यापासून राहत असून त्याने ३१ किलो गांजाचा साठा जमा केला होता अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पथकाने त्या ठिकाणी छापा मारून त्याच्याकडून ३१ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. संबंधित गांजा हा सुरज जंजाळ राहणार चाकण यांच्याकडून आणला असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून त्याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.