Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र
पिंपरी शहरात ‘H3N2’ चे २४ रूग्ण
![24 patients of 'H3N2' in Pimpri city](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/H3N2-780x470.jpg)
पिंपरी : शहरामध्ये इन्फ्लुएन्झा एच३एन२ चे आतापर्यंत एकूण २४ बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये शहर हद्दीबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. त्यापैकी २२ रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले आहेत. ‘एच 3 एन 2’ ने बाधित ३ रुग्ण हे यापूर्वीच रुग्णालयात दाखल होते. त्यांचे अहवाल खासगी रुग्णालयाकडून उशिरा कळविण्यात आले.
सर्व रूग्ण यापूर्वी बरे झालेले असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. एच३एन२ या आजारावर महापालिकेच्या सर्व रूग्णालयांमध्ये औषधोपचार उपलब्ध आहेत. सर्दी, खोकला, ताप, घसादुखी आदी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी जवळच्या महापालिका दवाखाना, रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी सहाय्यक आरोग्य वेद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.