Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात डेल्टा वेरिएंटचे 21 रुग्ण आढळले; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

मुंबई – कोरोनाच्या धोकादायक ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटने राज्यात शिरकाव केला आहे. राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे एकूण 21 रुग्ण आढळले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.राजेश टोपे म्हणाले, ’15 मेपासून जवळजवळ 7 हजाराच्या वर सॅम्पल घेण्यात आले असून यांचे whole genome sequencing करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रुग्ण सापडले आहेत.’

दरम्यान, डेल्टा व्हेरियंट भारतात ऑक्टोबर महिन्यात सापडला होता. भारतात दुसऱ्या लाटेचा कहर डेल्टा व्हेरियंटमुळेच झाल्याचा अंदाज आहे. डेल्टा प्लस त्याच्यातील स्पाईक प्रोटीनच्या मदतीने पेशींवर आक्रमण करतो आणि याचा रोगप्रतिकारकशक्तीवर जबरदस्त हल्ला होतो. त्यातच सध्या कोरोनावरच्या लसी या अल्फा व्हेरियंटसाठी बनवण्यात आल्या आहेत. त्यामुळेच त्या डेल्टावर परिणामकारक ठरण्याबद्दल साशंकता आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button