पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे बॅडमिंटन असोसिएशनला २० लाखांचा धनादेश
![20 lakhs check to Badminton Association from Pimpri-Chinchwad Municipal Corporation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/pimpri-chinchwad-corporation-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशन वतीने राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धा २०२३ या स्पर्धेंचं आयोजकत्व स्विकारलं आहे.
त्यासाठी पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या वतीने अतरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी २० लाख रकमेचा धनादेश पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशन यांचे नावे या संस्थेचे सह कार्यवाह राजीव बाग यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, प्रभारी क्रीडा अधिकारी अनिता केदारी आदी उपस्थित होते.
सदर स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यातील महाराष्ट्राच्या संघातून मालविका बनसोडे, चिराग शेट्टी हे दोघे सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर एच एस प्रनोय, लक्ष्य सेन, कीदांबी श्रीकांत, अश्रीत कश्यप, गायत्री गोपीचंद, त्रेसा जॉली, ध्रुव कपीला, इ. खेळाडू सहभागी होणार आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/image-38-1024x549.png)