2 हजार अश्लील मेसेज पाठवून तरुणीचा विनयभंग करणाऱ्याला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/msg.jpg)
एक, दोन नव्हे तर तब्बल 2 हजार अश्लील मेसेज पाठवून तरुणीचा विनयभंग करणाऱ्या एका तरुणाला मुंबईच्या मेघवाडी पोलिसांनीअटक केली आहे. सिराज रजीउद्दीन सिद्धीकी असे अटक केलेल्या 22 वर्षांच्या आरोपी तरुणाचे नाव आहे. सिराज हा ऑटोमोबाईल इंजिनिअर आहे.
तक्रारदार 19 वर्षीय तरुणी ही जोगेश्वरी परिसरात राहत असून ती कॉलेजमध्ये इंजिनिअरचे शिक्षण घेत आहे. इंस्टाग्रामवर फेक अकाउंटद्वारे सिराजने तक्रारदार तरुणीला ऑक्टोबर 2017 ते डिसेंबर 2018 या कालावधीत सुमारे दोन हजार अश्लील मॅसेज पाठविले होते, त्यात त्याने तिच्या चारित्र्यावर अश्लील शेरेबाजी करुन तिच्यावर टीका केली होती. याबाबत तिने मेघवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश देवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदेश कालापाड यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
दोन वर्षांपूर्वी तरुणीची भायखळा येथे राहणार्या सिराजशी ओळख झाली होती. ओळखीचं रुपांतर चांगल्या मैत्रीत झालं, त्यानंतर दोघंही सोशल मीडियाद्वारे एकमेकांशी संपर्कात होते. काही वेळा तो तिला भेटण्यासाठीही आला होता. याच दरम्यान त्याने तिला प्रपोज केलं, पण आधीच प्रियकर असल्याचं सांगून तिने त्याला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या सिराजने तिला त्रास देण्याच्या उद्देशाने बोगस मेलवरुन इस्ट्राग्रामवर तिचेच बोगस अकाऊंट दुसर्याच व्यक्तीचा फोटो अपलोड करुन उघडलं. त्यानंतर तो याच अकाऊंटवरुन तिला अश्लील मॅसेज पाठवित होता.
अटकेनंतर सिराजला सोमवारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.