हार्बर मार्गावर उद्यापासून धावणार 14 एसी लोकल

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी 14 वातानुकूलित लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवास अधिक सुखकर होणार आहे. नव्या एसी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल हार्बर लाईनवर चालवल्या जातील. सध्या सुरू असलेल्या नॉन-एसी लोकल सेवांच्या जागी या 14 एसी लोकल सेवा सुरू होतील.
या 14 एसी लोकल सेवा सुरू झाल्याने मध्य रेल्वेच्या मार्गावरील एसी लोकलची संख्या वाढणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर 80 लोकल सेवा सुरू आहेत. यात आता हार्बर मार्गावरील 14 एसी लोकलसेवांची भर पडणार आहे. मध्य रेल्वेच्या लोकलसेवांची संख्या 1820 इतकी कायम राहणार आहे. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी एसी लोकल सेवांच्या वेळेत नॉन-एसी लोकल सेवा सुरू ठेवली जाईल, अशी माहिती आहे.
हेही वाचा –प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ, पहिली झलक, गणपती बाप्पाचं दर्शन
अप ट्रेन
वाशीहून पहिली एसी लोकल पहाटे सव्वा चार वाजता सुटेल ती 4. 46 ला वडाळा रोडला पोहोचेल.
पनवेलवरून सकाळी 6.17 मिनिटांनी एसी लोकल सुटेल ती 7.36 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.
पनवेलवरून सकाळी 9.09 मिनिटांनी एसी लोकल सुटेल ती 10.30 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.
पनवेलवरून सकाळी 12.03 मिनिटांनी एसी लोकल सुटेल ती 13.04 ला वडाळा रोडला पोहोचेल.
पनवेलवरून सकाळी 13.31 मिनिटांनी एसी लोकल सुटेल ती 15.50 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.
पनवेलवरुन सकाळी 16.55 मिनिटांनी एसी लोकल सुटेल ती 17.26 ला वडाळा रोडला पोहोचेल.
पनवेलवरुन सकाळी 18.37 मिनिटांनी एसी लोकल सुटेल ती 19.59 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.
डाऊन ट्रेन
वडाळा रोड येथून 5.06 वाजता एसी लोकल सुटेल ती पनवेलला 6.08 ला पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 7.40 वाजता लोकल सुटेल ती पनवेलला 9.00 पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 10.34 वाजता लोकल सुटेल ती पनवेलला 11.54 पोहोचेल.
वडाळा रोड येथून 13.17 वाजता एसी लोकल सुटेल ती पनवेलला 14.20 ला पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 15.54 वाजता लोकल सुटेल ती वाशीला 16.43 पोहोचेल.
वडाळा रोड येथून 17.30 वाजता एसी लोकल सुटेल ती पनवेलला 18.32 ला पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 20.00 वाजता लोकल सुटेल ती पनवेलला 21.21 पोहोचेल.




