पुणे शहरात ‘H3N2’ चे १३ सक्रिय रूग्ण
पुणे महापालिका हद्दीत सद्य:स्थितीत १२ स्वॅब सेंटर सुरू
![13 active patients of H3N2 in Pune city](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/H3N2-780x470.jpg)
पुणे : शहरात जानेवारी ते मार्च या कालावधीत ’एच३एन२’चे १४६ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या १३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ७ रुग्ण विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून, ६ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. दाखल रुग्णांपैकी ४ जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
पुणे महापालिका हद्दीत सद्य:स्थितीत १२ स्वॅब सेंटर सुरू आहेत. घशातील स्त्रावाचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात येतात. सध्या रुग्णांसाठी बाणेर येथील रुग्णालयात २०० बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात ५० बेड उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. इन्फ्लूएन्झा विषाणूच्या ’एच३एन२’च्या साथीच्या पार्श्वभूमीवर, फ्लूसदृश आणि श्वसन संक्रमणाच्या रुग्णांच्या उपचार आणि तपासणीसाठी महापालिकेच्या सर्व रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.
एच३एन२ ग्रस्त रूग्णांची महिनानिहाय आकडेवारी
जानेवारी : २७
फेब्रुवारी : ८९
मार्च : ४६
सक्रिय रूग्ण : १३
महापालिकेकडे उपलब्ध औषध साठा
टॅमी फ्लू : ५६,००० श्र रेमिडिसिव्हिर इंजेक्शन : ७९२ व्हायल
पीपीई किट : ३५,८०० श्र रॅट किट : ३.२५ लाख
एन ९५ मास्क : २५ हजार श्र डिस्पोजेबल मास्क : १ लाख ७३