बीड हिंसाचारप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; १०१ जणांना अटक
![101 people were arrested in a major police operation in the case of Beed violence](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Beed-Maratha-Aarakshan--780x470.jpg)
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. बीडमध्ये जमावाने मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि तोडफोड केली. यामध्ये कोट्यावधींचं नुकसान झालं आहे. दरम्यान, बीड पोलिसांनी या घटनांमधील आरोपींवर कारवाई केली आहे. या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण बीड जिल्ह्यात फोडतोड आणि जाळपोळ प्रकरणी १०१ आरोपींना अटक करण्यात आले आहे. याशिवाय वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी जवळपास ३०० लोकांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
हेही वाचा – दिवाळी सुट्ट्यांमध्ये फिरायला जायचा विचार करताय? या ठिकाणांना अवश्य भेट द्या!
या घटनांमधील आरोपी हा विशेषतः तरुण वर्ग आहे. १७ ते २३ वयोगटातील ही मुलं या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत. यातील काही लोक फारच आक्रमक होते. त्यांचीही ओळख पटली असून ते सध्या फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यातील काही लोकांना अटक झालेली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.