breaking-newsमहाराष्ट्र

हिंगोलीत पैशाच्‍या वादातून मजुरांवर गोळीबार, दोघांना अटक

हिंगोली तालुक्‍यातील कनेरगाव नाका येथे पैसे देण्याच्‍या कारणावरून कंत्राटदाराने मजुरांच्‍या दिशेने गोळीबार केल्‍याचा प्रकार घडला, दरम्यान झालेल्या हाणामारीत दोघेजण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी सकाळी गुन्‍हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली. घटनास्थळावरून पोलिसांनी एक पिस्टल दोन जिवंत काडतुस जप्त केल्या आहेत.

गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी सदर घटनेत संबंधि दिलेल्‍या माहितीनुसार, कनेरगाव नाका येथे पुलाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी उत्तरप्रदेशातील मजूर कामाला आणण्यात आले आहेत. गुरुवारी (ता.१०) रात्री साडेनऊच्‍या सुमारास संतोषकुमार सानप (रा.भोपाळ) व रविकुमार किशनप्रसाद (रा.भोपाळ) हे कनेरगाव नाका येथे आले. यावेळी संतोषकुमार व कामगार संजयकुमार निशाद यांच्‍या पैशाच्‍या कारणावरून वाद निर्माण झाला. त्‍यातून हाणामारीस सुरुवात झाली. यावेळी इतर मजूर देखील धावून आले. मजुरांकडून हल्‍ला होत असल्‍याचे लक्षात येताच संतोषकुमार याने त्‍याच्‍याजवळ असलेल्‍या पिस्‍टलमधून तीन गोळ्या झाडल्‍या. यावेळी झालेल्‍या गोंधळात संजयकुमार निशाद (वय ३८) व हरिप्रसाद निशाद (वय ३८, दोघे रा. गडसोनी, उत्तरप्रदेश) हे जखमी झाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button