Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

‘हत्ती’च्या चिन्हासमोरील बटन दाबल्यावरही कमळाला मतदान – बसपा नेत्याचा आरोप

उत्तरप्रदेश – लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात आज देशातील 18 राज्ये आणि 2 केंदशासित प्रदेशांतील 91 मतदारसंघात मतदान पार पडले आहे. अशातच आता उत्तरप्रदेशातून बहुजन समाज पक्षातर्फे ईव्हीएम मशीनबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं असून बसपाच्या हत्तीचं चिन्ह दाबल्यावरही भारतीय जनता पक्षाच्या कमळाला मतदान जात असल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाचे नेते सतीश चंद्र मिश्रा यांनी केला आहे. याबाबत एका वृत्तसंस्थेशी बोलताना मिश्रा यांनी ‘आपण निवडणूक आयोगाकडे याबाबत रीतसर तक्रार दाखल केली असून हत्तीचं चिन्ह दाबल्यावरही भारतीय जनता पक्षाच्या कमळाला मतदान जात असल्याची एक व्हिडीओ क्लिप देखील पुराव्याखातर निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केली आहे.’ अशी माहिती दिली.

निवडणूक आयोगाकडे बहुजन समाज पक्षातर्फे दोन तक्रारी दाखल करण्यात आल्याचे सांगताना मिश्रा यांनी, उत्तरप्रदेशात काही ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे दलित मतदारांना मतदान करण्यापासून जबरदस्तीने रोखण्यात आल्याच्या देखील आरोप केला. मिश्रा यांनी याबाबत देखील आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्याचे सांगितले.

https://twitter.com/ANINewsUP/status/1116313197940809728

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button