स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा पुण्यात कैफियत मोर्चा; मानसिंग पाटील यांचे आवाहन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/IMG-20180625-WA0363.jpg)
शिराळा। शेतक-यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणा-या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुण्यात ‘कैफियत मोर्चा’ काढण्यात येणार आहे. त्यासाठी हजारोंच्या संख्येने शेतक-यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे शिराळा तालुका अध्यक्ष मानसिंग पाटील यांनी केले आहे.
उस उत्पादक व दूध उत्पादक यांच्या मागण्या मान्य करण्यास राज्य सरकार टाळाटाळ करीत आहे. त्यासाठी पुणे-शिवाजीनगर येथील अलका टॉकीज ते साखर संकूलपर्यंत दिनांक २९ जून २०१८ रोजी दुपारी १२ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणो पहिल्या हप्त्यामधील उसाचा थकित हप्ता त्वरीत द्यावा, दूध उत्पादकांच्या खात्यावर प्रतिलीटर दूधाला ५ रुपये अनुदान द्यावे. शेतक-यांचा सातबारा कोरा करावा, शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शिराळा तालुक्यातील शेतक-यांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाटील यांनी केले आहे.