सुजय विखे म्हणाले, काम करता येत नसेल तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा
शिर्डी | “राज्यातील जनतेला न्याय देण्याची जबाबदारी महाविकासआघाडी सरकारची आहे. जर तुम्हाला काम करता येत नसेल तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा,” असे वक्तव्य खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. “स्वतःच्या स्वार्थासाठी तीन पक्ष एकत्र आले आहे,” असा घणाघाती आरोपही सुजय विखेंनी केला.
“कंपाऊडरला डॉक्टरांपेक्षा अधिक ज्ञान असते. त्यामुळे मी नेहमी डॉक्टरपेक्षा कंपाऊडरकडून गोळ्या घेणे पंसत करतो”, असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केले होते. त्यावरही सुजय विखेंनी प्रतिक्रिया दिली.
“खासदार संजय राऊतांचे वक्तव्य निंदनीय आहे. त्यामुळे संजय राऊतांनी डॉक्टरांची माफी मागावी. संजय राऊतांनी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टरांचा अवमान केला आहे. डब्ल्यू एचओ आणि डॉक्टरांपेक्षा आपण आणि आपला पक्ष जर हुशार आहात तर कोरोना का थांबवला नाही,” असा प्रश्नही सुजय विखेंना उपस्थित केला आहे.





