सिद्धिविनायक मंदिराचे टपाल तिकीट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Untitled-2-10.jpg)
सिद्धिविनायक मंदिराचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट तयार करण्यात आले आहे. भारतीय टपाल विभागातर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता या तिकिटाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त मोठय़ा संख्येने गणेशभक्त सिद्धिविनायक मंदिरात येत असतात. भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज झाले असून कर्मचारी गणेशोत्सवाची तयारी करण्यात व्यस्त आहेत. गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिराचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट भारतीय टपाल विभागाकडून तयार करण्यात आले आहे. या तिकिटाचे लोकार्पण सिद्धिविनायक मंदिरामध्ये सोमवारी सकाळी ११ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यासह सर्व विश्वस्त, प्रधान सचिव आणि महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल उपस्थित राहणार आहेत.