सिंचन घोटाळा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखल केले शपथपत्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Ajit-Pawar-1-copy.jpg)
मुंबई | महाईन्यूज
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल केलेले आहे. सिंचन घोटाळाप्रकरणी त्यांच्याविरोधातील दाखल याचिका रद्द करण्यासाठी त्यांनी हे शपथपत्र दाखल केलेले आहे.मंत्री म्हणून कर्तव्य बजावताना मी कोणत्याही भ्रष्ट अथवा बेकायदा कृत्यात सहभागी झालेलो नव्हतो. मंत्री आणि व्हीआयडीसीचा माजी अध्यक्ष या नात्याने मी सर्व नियमांचे पालन करूनच सार्वजनिक कर्तव्ये पार पाडलेली आहेत.
शिवाय, सिंचन घोटाळ्याच्या कोणत्याही एफआयआर किंवा आरोपपत्रांमध्ये मला आरोपी केलेले नाही, असं स्पष्टपणे सांगितलेले आहेत. यामुळे या घोटाळ्यात मी आरोपी नाही, मला आरोपी ठरवता येणार नाही, तसेच माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयास देता येणार नसल्याचे त्यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर केलेल्या शपथपत्राद्वारे सांगितलेले आहे.