Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आता ‘सावित्री उत्सव’ म्हणून ओळखला जाणार
![Savitribai Phule's birthday will now be known as 'Savitri Utsav'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/सावित्रीबाई-फुले.jpg)
मुंबई – राज्याच्या महिला व बालविकास विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. एक परिपत्रक जारी करत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणजे ३ जानेवारी हा दिवस सावित्री उत्सव म्हणून ओळखला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
वाचा :-धक्कादायक! ‘हे भारत माते मला माफ कर’, छेडछाडीला कंटाळून 17 वर्षीय मुलीची आत्महत्या
सावित्री बाई फुले यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून राज्यभर ३ जानेवारी हा दिवस सावित्री उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सर्व अंगणवाड्या, कार्यालये यामध्ये सावित्री फुले यांच्या कार्याला परिचय करून देणाऱ्या विविध कार्यक्रमांचं आयोजन या दिवशी केले जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.