breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांना पितृशोक; माधव पाटणकर यांचे निधन

मुंबई । महाईन्यूज ।  प्रतिनिधी

शिवसेना मुखपत्र ‘सामना’च्या संपादक रश्मी उद्धव ठाकरे यांचे वडिल माधव गोविंद पाटणकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.  ते 78 वर्षांचे होते.  मुंबईत अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार  सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

रश्मी ठाकरे यांचे वडिल  माधव पाटणकर यांची प्रकृती काही दिवसांपासून अस्वस्थ होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.  आज उपचारादरम्यान क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button