breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा : कान्हरवाडीत वादळी वाऱ्याने नुकसान
सातारा : कान्हरवाडी ता. खटाव येथे आज दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यात जनावरांच्या शेडचा पत्रा उडाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. वसंत भगवान येलमार यांचा कान्हरवाडीतील पाटील मळा नावाच्या शिवारात घर आणि जनावरांचे शेड आहे. आज दुपारी झालेल्या वादळाने व पावसाने त्यांच्या शेडचा पत्रा उडाला. यात त्यांच्या आई बायडाबाई भगवान येलमार यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली असुन त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वादळी पावसाने येलमार यांच्या शेडचे सुमारे 2 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.