सलमान खान लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात?
![Salman Khan absent from court in antelope poaching case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/0salman_khan.jpg)
मुंबई- अभिनेता सलमान खान लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सध्या चांगलीच जोर धरत आहे. काँग्रेसच्या तिकीटावर सलमान खान इंदोरर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याविरोधात सलमानला मैदानात उतरवण्याचा काँग्रेसचा मानस आहे. या साठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न चालू असल्याचे बोलले जात आहे परंतु याबाबत सलमान खान किंवा काँग्रेसकडून अद्याप कुठलाही अधिकृत दुजोरा आलेला नाही.
सुमित्रा महाजन या इंदूरमधून सलग आठवेळा खासदार झालेल्या आहेत. त्यामुळे भाजपकडून ही सीट खेचून आणण्यासाठी काँग्रेस सलमान खान यांना तिकीट देऊन धक्कातंत्राचा वापर करू शकते.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी यापूर्वी सलमान खानचं नाव सुचवलं होतं. नुकतंच त्याला मध्य प्रदेश पर्यटन विभागाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले होते.