संतापजनक! रोह्यात अल्पवयीन मुलीचा बलात्कार करुन खून
![Shocking! Eight-year-old girl sexually abused by teacher in Kalyan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Rape.jpg)
रायगड: रोहा तालुक्यातील तांबडी येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना घडलेली आहे. या घटनेमुळे रोहा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही मुलगी १४ वर्षांची होती. रविवारी संध्याकाळपासून ही मुलगी बेपत्ता होती. त्यामुळे कुटुंबीयांकडून तिचा शोध सुरु होता. अखेर रात्री उशीरा गावाबाहेर या मुलीचा मृतदेह सापडला आहे. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
पोलिसांच्या अंदाजानुसार,रविवारी संध्याकाळी साधारण साडेसात ते आठच्या सुमारास तांबडी परिसरातील एका फार्महाऊसवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. यानंतर नराधमांनी तिचा खून करुन तिचा मृतदेह गावाच्या बाहेर टाकून पळ काढला आहे. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ हे रोह्यात दाखल झालेले आहेत. रोहा पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.