शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब, राज्य सरकारने काढला जीआर…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-80.png)
महाविकास आघाडी सरकारने बुधवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१९ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णयावर आज शिक्कामोर्तब करण्यात आला. यासंदर्भात जीआर देखील जारी करण्यात आला आहे.
मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराने लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं होते. कोल्हापूर सातारा, सांगली याठिकाणी पुराचा मोठा फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे १३ जिल्ह्यातील तब्बल २ लाख १ हजार ४९६ हेक्टरवर क्षेत्रावरील पिके बाधित झाली होती. ज्या शेतकऱ्यांना याचा फटका बसला त्यांना सरकारने दिलासा दिला आहे.