शिवस्मारक भ्रष्टाचारात चंद्रकांत पाटील दोषी, आमच्याकडे पुरावे आहेत, त्यांना उघडं पाडू : नवाब मलिक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/nawab-malik-Frame-copy-1.jpg)
नागपूर:– मुंबईजवळच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या बांधकाम निविदेतील कथित भ्रष्टाचारावरुन आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर थेट हल्ला केला आहे. “शिवस्मारक बांधकाम निविदेमागे मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम्ही विधानसभा निवडणुकीपूर्वीच केला होता. आता कॅगच्या अहवालानंतर त्यावर शिक्कामोर्तब होत चाललेलं आहे.
चंद्रकांत पाटील यामध्ये दोषी आहेत, त्यांनीच हे सर्व घडवून आणलं आहे”, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. भाजप म्हणतंय की स्मारक थांबवण्यासाठी हे कटकारस्थान सुरु आहे, मात्र तसं नाही. स्मारक बनणार आहेच, पण महाराजांच्या नावाने पैसे खाण्याचं कटकारस्थान भाजप नेत्यांनी, मंत्र्यांनी केलं होतं, त्यांना उघडं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा थेट इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.