Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

महाराष्ट्र केसरी 2019 कुस्ती स्पर्धेच्या लोगोचे अनावरण

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणा-या यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या लोगोचे उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्रातील तमाम सर्व कुस्ती शौकिनांच्या नजरा लागलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा पुणे मुक्कामी 2 ते 7 जानेवारी दरम्यान बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे. सदर स्पर्धा यशस्वी पणे पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने कंबर कसली असून, अनेक जिल्हा तालीम संघाच्या निवड चाचणी देखील सुरू झाल्या आहेत.चालू वर्षीच्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेच्या लोगोचे (बोधचिन्ह) उदघाटन नुकतेच पुणे येथे करण्यात आले.

यावेळी सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापक संचालक मा. अनिरुद्ध देशपांडे सर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस मा. बाळासाहेब लांडगे सर, कार्याध्यक्ष मा.नामदेवराव मोहिते साहेब, उपाध्यक्ष मा. सर्जेराव शिंदे साहेब, कार्यालयीन सचिव श्री ललितजी लांडगे ,रुस्तम ए हिंद ,महाराष्ट्र केसरी पै. अमोल बुचडे, उपाध्यक्ष श्री गणेश कोहळे  , उपाध्यक्ष दयानंद भक्त , विभागीय सचिव पै भारत मेकाले , तांत्रिक सचिव बंकट यादव , भारतीय शैली कुस्ती महासंघाचे सहसचिव पै चंद्रशेखर सर्जेराव शिंदे तसेच कुस्तीगीर परिषदेचे नवनिर्वाचित पदाधिकारी व सर्व न्यूज चॅनलचे पत्रकार उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button