शाळेचे शूल्क भरण्यास विलंब केल्याने मुलाला तब्बल तीन तास ठेवले डांबून
उदगीर, (महा-ई-न्यूज) – उदगीर येथील एका इंग्लिश स्कूलमध्ये दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची शालेय फिस न भरल्यामुळे शाळेतच तीन तास डांबून ठेवल्याचा प्रकार घडलाय उदगीरच्या पोलिस ठाण्यात दोन शिक्षक व संस्थाचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील लीटल इंग्लिश स्कुलमध्ये कार्तिक स्वामी यांचा मुलगा दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याची गत वर्षाची सहा हजार व चालू वर्षाची बारा हजार असे एकूण अठरा हजार रुपये शालेय शूल्क पालकांच्या वैयक्तिक अडचणीमुळे भरता आले नाही. यामुळे शाळेने या विद्यार्थ्याला शाळेच्या बसने घरी न सोडता चक्क बारा ते तीन वाजेपर्यंत तीन तास शाळेत कोंडून ठेवले आहे. असा आरोप पालकाने केला आहे.
यासंदर्भात मुलाच्या पालक स्वामी यांनी तत्काळ ही माहिती उदगीर पोलिसांना दिली. त्यावर पोलिसांनी या प्रकाराची शहानिशा करून शाळेचे दोन शिक्षक व संस्थाचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उदगीर पोलिस अधिक तपास करत आहेत