व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन दुष्काळाचे निवारण होत नाही – अजित पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/ajit-pawar-1.jpg)
पुणे – राज्यातील अनेक भागातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यात जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून त्यावर सरकारकडून काही उपाय योजना करताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे राज्याच्या अनेक भागातील दुष्काळी भागाचा दौरा करीत आहेत. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातुन संवाद साधत आहेत. यातून प्रश्न आणि समस्या सुटणार नाहीत, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ईव्हीएम मशीन बाबत शंका व्यक्त केली आहे. तर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ईव्हीएम मशीन बाबत आपल्याला शंका नसल्याचे म्हटले आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी ईव्हीएम मशीन बाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.
ईव्हीएम मशीनबाबत आपल्या मनात कोणतीही शंका शंका नसल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. इतकंच नाही, तर ईव्हीएममध्ये दोष असता तर भाजपाचा पाच राज्यात पराभव झाला नसता. पण काहींच्या मनात ईव्हीएमबाबत शंका आहे. आता यावर कोर्टाने निर्णय दिला आहे, असेही अजित पवार म्हणाले आहेत.