Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

व्यापाऱ्यावर प्राणघातक चाकू हल्ला

जळगाव | महाईन्यूज

जुन्या वादातन दिवान भिकमचंद थोरानी (५१, रा.सिंधी कॉलनी) यांच्यावर शंभु उर्फ सुमित वसंदास वलभानी याने मंगळवारी रात्री मध्यरात्री १२.३० वाजता घरासमोर चाकू हल्ला केल्याची घटना सिंधी कॉलनीत घडली. थोरानी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, नंतर खासगी दवाखान्यात हलविण्यात आलेले आहे.

दिवान यांचे फुले मार्केटमध्ये रेडीमेड कपड्याचे दुकान असून भाऊ नंदकुमार असे दोघं जण ते सांभाळतान. मंगळवारी रात्री १२.३० वाजता दोन्ही भाऊ दुकानातून घरी आले असता मोहीम कोरवानी, दीपक सटाणा, नंदलाल थोरानी, रवी रुपचंद कटारिया, राहूल वसंतदास वलभानी असे गल्लीत मोहीत कोरवानी यांना जुन्या भांडणातून शिवीगाळ करीत होते. हा प्रकार पाहून दिवान त्यांना समजविण्यासाठी गेले असता शंभु याने खिशातील चाकू काढून दिवान यांच्या पोटात खुपसला. रक्तबंबाळ झालेल्या दिवान यांना भाऊ नंदकुमार यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. पोलिसांनी जखमी यांचा दवाखान्यात जावून जबाब घेतला. याप्रकरणी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक विशाल वाठोरे व सचिन मुंडे करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button