breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

विमानात दिवे मालवल्यानंतर चोरटा स्पर्श, प्रवाशाला मुंबई विमानतळावर अटक

थाय एअरवेजच्या बँकॉक-मुंबई विमानात शेजारी बसलेल्या महिला प्रवाशाचा विनयभंग केल्या प्रकरणी अंधेरीतील सहार पोलिसांनी मंगळवारी चंद्राहास त्रिपाठी याला अटक केली. आरोपी चंद्रहास एमबीए पदवीधर असून एका कंपनीत सेल्स विभागात उच्चपदावर आहे. तक्रारदार महिला मुंबईत वकिली करते.

सोमवारी रात्री विमानाने बँकॉकच्या विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर विमानातील दिवे मालवण्यात आले. त्यावेळी आरोपीने अयोग्य पद्धतीने स्पर्श करुन विनयभंग केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. चंद्राहास त्रिपाठीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास विमानाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडींग केल्यानंतर सीआयएसएफने आरोपी चंद्राहास त्रिपाठीला ताब्यात घेतले.

त्रिपाठी मुंबईहून विमानाने मध्य प्रदेशला जाणार होता. पण त्याआधीच त्याला महिलेच्या तक्रारीवरुन अटक करण्यात आली. चंद्रहास त्रिपाठीने आधी महिलेच्या हाताच्या बोटांना स्पर्श करुन ती झोपलीय का ? याची खातरजमा करुन घेतली. त्यानंतर त्याने अयोग्य पद्धतीने स्पर्श केला असे सहार पोलीस स्टेशनमधील तपास अधिकाऱ्याने सांगितले. तक्रारदार महिला तिच्या कामानिमित्त थायलंडला गेली होती. तिथून परतताना विमानामध्ये सहप्रवाशाने तिचा विनयभंग केला.

विमानाने उड्डाण केल्यानंतर कोणीतरी मला स्पर्श करतेय असे जाणवले. माझ्या शेजारी बसलेल्या माणसाने अजाणतेपणी स्पर्श केला असेल असे समजून मी त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. त्यानंतर माझ्या मांडयामध्ये मला स्पर्श जाणवला. आरोपी झोपेचे सोंग घेऊन माझ्या शरीराला स्पर्श करत होता. सदर महिलेने लगेच हा प्रकार क्रू च्या कानावर घातला. त्यांनी आसन बदलायला मदत केली. मुंबईत पोहोचल्यानंतर महिलेने तक्रार दाखल करण्यासाठी क्रू कडे मदत मागितली. एअरलाईनच्या क्रू ने सीआयएसएफला बोलवले त्यांनी त्रिपाठीला पोलिसांच्या ताब्यात दिले. चंद्राहास त्रिपाठीने त्याच्यावरचे आरोप फेटाळले आहेत. आपण निर्दोष असून जाणीवपूर्वक स्पर्श केलेला नाही असे त्याने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button