breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विनोद अग्रवाल आणि महेश बालदी या दोन अपक्ष आमदाराचा भाजपाला पाठिंबा

विनोद अग्रवाल आणि महेश बालदी या दोन अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आता भाजपाचं संख्याबळ १०५ वरुन १०७ झालं आहे. निवडणूक निकालाच्या दिवशी भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. त्यानंतर चारजणांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने त्यांचं संख्याबळ ६० झालं आहे. तर भाजपाला आता २ अपक्ष आमदारांचं बळ लाभल्याने भाजपाचं संख्याबळ १०७ झालं आहे.

ANI✔@ANI

Maharashtra: Two independent MLAs, Vinod Agrawal and Mahesh Baldi extend their support to Devendra Fadnavis & BJP.

View image on Twitter

१,४१९१०:०५ म.पू. – २९ ऑक्टो, २०१९Twitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता१५२ लोक याविषयी बोलत आहेत

जनतेने निवडणूक निकालात जो कौल दिला तो महायुतीच्या बाजूने आहे. मात्र अब की बार २२० के पार हे काही प्रत्यक्षात आलेलं नाही. भाजपाने मित्रपक्षांसह १६४ जागांवर तर शिवसेनेने १२४ जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र शरद पवार यांनी विरोधीपक्षाला त्यांच्या रुपाने जो चेहरा दिला आणि ज्या प्रमाणात सभा घेतल्या त्याचा परिणाम मतदानावर झाला. भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या जागा २०१४ च्या तुलनेत कमी झाल्या. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button