विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंना कोरोनाची लागण
![There is no formula for the post of Chief Minister - Nana Patole](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/nana-patole.jpg)
मुंबई – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत चाललाय. कोरोनाविरोधातील लढाईत अनेकजण कोरोनाच्या विळख्यातून जसे अनेक कोरोना योद्धे सुटले नाहीत तसं अनेक लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली. काही नेत्यांना तर कोरोनामुळे आपला जीव गमावला लागला. आता कोरोनामुळं पावसाळी अधिवेशनावर देखील सावट आहे. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील कोरोनामुळं वेळेआधी स्थगित करावं लागलं होतं. कोरोनाच्या सावटामुळं पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं घेण्याचा निर्णय झाला आहे. मात्र त्यावर देखील कोरोनाचं सावट आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. याआधीही राज्यातील अनेक आमदारांसह काही मंत्र्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
आता खुद्द विधानसभा अध्यक्षांनाच कोरोनाची लागण झालीय. नाना पटोले यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की,’गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन.’ असं विधानसक्षा अध्यक्षांनी म्हटलं आहे.