Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाशीम जिल्ह्यातील एकमेव कोरोना बाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/CoronaVirus-4.jpeg)
वाशीम | वाशीम जिल्ह्याला दिलासा देणारी गोड बातमी समोर येत आहे. वाशीम जिल्ह्यातील एकमेव कोरोना बाधित रुग्णाचे 20 दिवसाच्या उपचारानंतर दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यानंतर आज या रुग्णाला घरी जाण्यासाठी सुट्टी होणार असल्याच वाशीमचे जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी सांगितले.
आता वाशीम जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. मात्र कोरोना बाधित रुग्ण नाही म्हणून गाफील राहून चालणार नाही. स्थलांतर झालेल्या नागरीकांकडून धोका अधिक असेल असही या वेळी मोडक यांनी सांगितल.