breaking-newsपुणेमहाराष्ट्र

वारीत वादाची ठिणगी; संभाजी भिडे पालखी सोहळ्यात सहभागी होणार ?

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे शनिवारी पुण्यात आगमन होत असून या पालखी सोहळ्यात आता वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे हे स्वयंसेवकासह संचेती हॉस्पिटलच्या बाजूच्या पुलावरून दोन्ही पालख्याच्या दिंडी मागे सहभागी होणार आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन होत असून या पालखी सोहळ्यात संभाजी भिडे गुरुजी सहभागी होणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे स्वयंसेवक पराशर मोने यांनी दिली. आम्हाला कोणीही परवानगी नाकारली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पारंपरिक वेशभूषा परिधान करून स्वयंसेवक सहभागी होतील, असे ते म्हणालेत. दुपारी पावणे चारच्या सुमारास ते सोहळ्यात सहभागी होतील.

गेल्या वर्षी देखील पुण्यात ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत अडथळा आणल्याप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी, संजय जठार, पराशर मोने, रावसाहेब देसाई यांच्यासह सुमारे एक हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. फर्ग्युसन रस्त्यावरुन माऊलींची पालखी जात असताना, संभाजी भिडे गुरुजींचे काही समर्थक दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करु लागले. यापैकी काहीजणांकडे तलवारीही होत्या. यावर दिंडीतील प्रमुखांनी आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला.

भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी संभाजी भिडे हे आरोपी असून गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने अनेकांना मुले झाली, असे वादग्रस्त विधान केल्याने त्यांना नुकतीच नोटीसही बजावण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button