Breaking-newsमहाराष्ट्र
लोकांमध्ये जाऊन मते मागायला भाजप-सेनेला तोंड राहिले नाही – अशोक चव्हाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/ashok-chvhan-sangharsh-yatra-.jpg)
सांगली- विरोधी पक्षांकडून आगामी निवडणुकांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. काँग्रेसकडून राज्यात संघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे. आज सांगली येथे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून जनसंघर्ष यात्रेच्या तिस-या दिवसाचा शुभारंभ झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी भाजपकडून जाती जातीत भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले आहे. तसेच लोकांमध्ये जाऊन मते मागायला भाजप-सेनेला तोंड राहिले नाही, या विखारी शक्तींना दूर करा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.