Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

रेल्वे रुळांवर पेटता सिलिंडर

  • मोटरमनच्या प्रसंगवधानामुळे अपघात टळला

मुंबई:- माटुंगा-कुर्ला मार्गादरम्यान माटुंगा स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर सोमवारी दुपारच्या सुमारास पेटता सिलिंडर आढळून आल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.हा प्रकार लक्षात आल्यानंतर या मार्गावर सुसाट निघालेली लोकल रेल्वे कामगारांनी हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सावध केल्याने लोकलच्या मोटरमनने आपत्कालिन ब्रेक दाबून लोकल थांबवली. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. सुरक्षेचे नियम न पाळता रेल्वे रुळांलगत सुरू असलेल्या या कामांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सीएसएमटीतून सोमवारी दुपारी १२.३६ च्या सुमारास अंबरनाथसाठी धीमी लोकल सुटली. या लोकलवर मोटरमन महेश परमार कार्यरत होते. लोकलने दुपारी १२.५७ वाजता माटुंगा स्थानक सोडले. त्यावेळी लोकलने चांगलाच वेग पकडला होता. मात्र अप जलद व डाऊन जलद मार्गिकेच्या मधल्या भागांत काही काम सुरू होते. यासाठी गॅस सिलिंडरचाही वापर केला जात होता. त्याचे वळी सिलिंडरने पेट घेतल्याचे मोटरमन परमार यांना दिसले. त्याच वेळी जवळपास असलेले कामगारही लोकल थांबवण्याचा प्रयत्न करू लागले. सिलिंडर पेटत असल्याने त्याचा मोठा स्फोट होऊन जवळूनच जाणाऱ्या लोकल गाडीलाही त्याचा फटका बसू शकतो, हे लक्षात आल्याने खबरदारी म्हणून परमार यांनी आपत्कालीन ब्रेक दाबून लोकल थांबवली. त्यामुळे लोकल घटनास्थळापासून आधी थांबली.कामगारांनी सावध केल्याने लोकलमधील आपत्कालीन ब्रेक दाबून गाडी थांबवली. आग विझवण्यासाठी माझ्याजवळील अग्निरोधक यंत्रणाही कामगारांना देण्याचा प्रयत्न केला. परंतु कामगारांनी पेटता सिलिंडर घेऊन पश्चिम दिशेला एका झुडपात टाकून दिला.

– महेश परमार, मोटरमन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button