रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/local-train-.jpg)
रेल्वेच्या विविध तांत्रिक कामांसाठी आज, २४ नोव्हेंबरला तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग, हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप व डाऊन धीमा मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. या दिवशी उपनगरी रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावतील.
मध्य रेल्वे-मुख्य मार्ग
कुठे : माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग
कधी : स. १०.३० ते दु. ३.००
परिणाम : सीएसएमटीतून सुटणाऱ्या जलद किंवा अर्धजलद उपनगरी रेल्वे माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर धावतील. मुलुंडनंतर पुन्हा लोकल जलद मार्गावर धावणार आहेत.
हार्बर मार्ग
कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर
कधी : अप मार्गावर स. ११.१० ते दु. ३.४० आणि डाऊन मार्गावर ११.४० ते दु. ४.१० वा.
परिणाम : ब्लॉक काळात सीएसएमटी, वडाळा ते वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगाव दरम्यानच्या उपनगरी रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावतील.
पश्चिम रेल्वे
कुठे : बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप व डाऊन धीमा मार्ग
कधी : स. १०.३५ ते दु. ३.३५ वा.
परिणाम : चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या व सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या गोरेगाव ते बोरिवली दरम्यान जलद मार्गावर धावणार आहेत. एक ते चार नंबर फलाटावर ब्लॉक काळात लोकल थांबणार नाही.