रिक्षाचालकाच्या मांडीत हँडल घुसले, पुणे-मुंबई महामार्गावर विचित्र अपघात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/auto-accident-Mumbai-Pune.jpg)
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर गुरूवारी(दि.13) रात्री एक विचित्र अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालकाच्या मांडीत हँडल घुसले. बरेच प्रयत्न करुनही हँडल बाहेर काढता न आल्याने हँडल कट करून, हँडलसह चालकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर छोटी शस्त्रक्रिया करून ते हँडल काढण्यात यश आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री साडे नऊच्या सुमारास पुण्याच्या कामशेत येथे हा विचित्र अपघात झाला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरने रिक्षाला धडक दिली. जोरदार धडक बसल्याने रिक्षाचालकाच्या मांडीत रिक्षाचे हँडल घुसले. तातडीनं बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चालकाच्या मांडीत घुसलेले हँडल काढण्याचे बरेच प्रयत्न केले, मात्र ते अपयशी ठरले. अखेर रिक्षाचे हँडल कट करण्यात आले आणि त्या हँडलसह चालकाला खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. त्यानंतर डॉक्टरांनी छोटी शस्त्रक्रिया करून ते हँडल काढलं.