राष्ट्रवादीची उमेदवारी देवूनही नमिता मुंदडांचा भाजपमध्ये प्रवेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/1569827531.jpg)
बीड |महाईन्यूज|
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. नमिता मुंदडा यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, नमिता मुंदडा यांना केज मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नमिता मुंदडा या पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर यावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यांनी आज राष्ट्रवादीच्या सदस्य पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईमेलद्वारे पाठवून दिला. नमिता मुंदडा यांनी आज परळी येथील गोपीनाथ गडावर भाजपमध्ये प्रवेश केला. ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.