रायगड जिल्ह्यात 15 जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन
![Follow the rules, otherwise there is a strong possibility of lockdown in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/CoroanLockdown-1-1.jpg)
रायगड जिल्ह्यात वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येला रोखण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील निर्णय आज पालकमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. गेल्या साडेचार महिन्यांच्या कालावधीत रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच, गेल्या बारा दिवसात ही संख्या सुमारे चार हजार पर्यंत पोहचली आहे. यामध्ये पनवेल, अलिबाग, पेण, रोहा आणि उरण परिसरात रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे, यापूर्वीच अनेक तालुक्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेले आहे.
याचदरम्यान, आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे, येत्या 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 24 जुलैपर्यंत रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.