राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केला, विनोद पाटलांचा आरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/विनोद-पाटील.jpg)
औरंगाबाद – मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. SEBC प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केला आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजसोबत राज्य सरकारचं वर्तन दोषपूर्ण आहे. विशेष बाब म्हणून जागाही वाढवल्या नाहीत. ‘फी’मध्ये देखील सवलत दिली नाही. राज्य सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असल्याचं विनोद पाटील म्हणाले. राज्य सरकारने लाखो मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान केले आहे. सरकार मराठा विद्यार्थ्यांच्या विरोधात असल्यासारखं वागतंय. सुप्रीम कोर्टातही राज्य सरकारची चाल ढकल सुरु आहे. आता सरकारच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचं विनोद पाटील म्हणाले आहेत.